STORYMIRROR

Shanti Gurav

Classics

4  

Shanti Gurav

Classics

आला श्रावण

आला श्रावण

1 min
251

आल्या सरसर श्रावणाच्या नाचऱ्या साजऱ्या सरीवर सरी

मनामनात आनंदाच्या ऊर्मी उठल्या ऊरी.

     सुरू जाहला आनंद सोहळा तनामनाचा

     चराचरात भरला जोश चैतन्याचा.

उन्हापावसाचा खेळ करत आली श्रावण सर

पानाफुलांना आला अनोखा बहर.

     हातात हात घालून आले सणवार

     व्रतवैकल्यांची झाली भरमार.

बहीण भावाच्या नात्याचे पवित्र सुंदर बंधन

साजरा होतो पावन सण रक्षाबंधन.

     गोकुळाष्टमीचा उत्साह न्यारा

     कृष्णजन्माच्या आनंदाने रंगून जातो संसार सारा.

बांधल्या जातात हंडीवर हंडी

बालगोपाळ जोशात फोडतात दहीहंडी.

     नागोबांपासून संरक्षणाची मिळाली हमी

     स्त्रिया करतात मोठ्या उत्साहाने साजरी नागपंचमी.

आली मंगळागौर नटून थटून

माहेरच्या ओढीने नवविवाहित मुलींचे मन गेले रंगून.

     कोळ्यांचा सण मोठा कृतज्ञतेचा हा नारळी पुनवेचा

     दर्याचा राजा मान करतो सागराचा अर्पून नारळ सोन्याचा.

नभाने बांधली इंद्रधनुष्याची कमान

सोनेरी केशर शिंपीत आला श्रावण.

      अवखळ पावसाबरोबर बेधुंद झाला वारा

      श्रावणाच्या आगमनाने हर्षित झाला निसर्ग सारा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics