STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics Inspirational

4  

Jyoti gosavi

Classics Inspirational

लडिवाळ मराठी

लडिवाळ मराठी

1 min
440

ट, ठ ,ढ आणि

पोटफोड्या ष

किती कठीण उच्चार

पण मला वाटतात 

ते पिसासारखे अलवार : १:


ण बाणासारखा ,वाटतो

खोचक, पण जातो सरळ

जसा मराठी माणूस वाटतो

उर्मट पण मनाने असतो सरळ


कोणत्याच भाषेला नाही

 ळ ची गोडी लडिवाळ 

अमृतातेही पैजा जिंके

ज्ञानोबा मराठी चे बाळ


क्ष ने शिकवला क्षत्रिय बाणा 

उंच मान आणि ताठ कणा

 कारण आमचा म्होरक्या

 जिजाऊचा पुत्र शिवराणा


ज्ञ ने ज्ञानाची गंगा 

ज्ञानेश्वरी अवतरली

 ज्ञानाने सर्वांना ती

रसाळ वाणीने पाजली


अशा माझ्या मराठीची

 कोणाशी नाही बरोबरी

थोडी कडक तरी मुलायम

 आवडते मज खरोखरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics