STORYMIRROR

Shanti Gurav

Others

3  

Shanti Gurav

Others

आमच्या मायेचा कोकण

आमच्या मायेचा कोकण

2 mins
63

कोकण म्हणजे आमचा श्वास

आमच्यासाठी कोकण आहे खूपच खास.


महाराष्ट्राच्या भूमीवर अवतरलेले हे नंदनवन

निसर्गाने केली इथे मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण.


माडापोफळीच्या सावलीत विसावलेली घरे कौलारू

निळसर, नितळ सागर जलात हेलकावे घेतात वारू.


नागमोडी वळणाच्या लाल मातीच्या वाटा

स्वच्छ, भव्य किनाऱ्यावर धडकतात फेसाळत्या लाटा.


कोकणाचे गडकिल्ले सांगतात कोकणाचा संपन्न इतिहास

इथल्या पदार्थांची चव सांगणारा सुटतो घमघमणारा सुवास.


इथल्या माणसांची मने मायेनी ओथंबलेली 

'अतिथी देवो भव ' प्रथा  घराघरात रुजलेली.


काजू, नारळ, करवंद, फणस हा कोकणी मेवा

गोड,रसाळ हापूस आंबा इथलाच चाखून पहावा.


माडाच्या बनात घुमतो कोकिळेचा मंजुळ नाद

मंदिरांच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घ्यावा मनमुराद.


पावसात धबधबे कडेकपारी ओसंडून वाहती भारी

सागरकिनारी पसरल्या शुभ्र वाळूच्या चादरी.


पाचूच्या हिरवळीत जणू पसरलेले मोती

पावलोपावली नजरेस पडते अनेक कलांनी नटलेली संस्कृती.


दशावतारी नाटक, सोंग, बाल्या नाचाची पर्वणी

गौरी गणपती, शिमगा सणावारांचा उत्साह भरलेला मनोमनी.


सह्याद्रीच्या कुशीत वसलेली कोकण भूमी

ही तर आहे परशुरामाची पावन भूमी.


मनात कायम जपून ठेवावा मायेचा अनमोल ठेवा

जगाच्या नकाशात याचा गोडवा गाईला जावा.


Rate this content
Log in