STORYMIRROR

Shanti Gurav

Inspirational

3  

Shanti Gurav

Inspirational

माणुसकीतले ऐक्य

माणुसकीतले ऐक्य

1 min
200

निशेच्या गर्भातून किरणांचे अंकुर फुटावे

नैराश्यातून आनंदाचे तुषार उडावे


हातात जे गवसले ते जतन करावे

मिळालेल्या जीवनाचे सोने करावे


दुसऱ्यांच्या वाटेवरचे अडसर स्वतः दूर सारावे

मी कोण? तू कोण? असे प्रश्न न पडावे


घट्ट हात धरून एकमेकांचा, संकटांशी लढण्यास सज्ज व्हावे

सोबतीला प्रेमाची शिदोरी घेऊन मार्गक्रमण करावे


आशेच्या दिव्यातले तेल कधीही संपू न द्यावे

समतेच्या प्रकाशात सकलांना एकत्र आणावे


निराशेच्या भूतकाळातून अलगद बाहेर पडावे

नवे विचार रुजवत वर्तमानात आनंदाने जगत राहावे


दुःखाचे निर्माल्य विसर्जित करावे

आनंदाचे, प्रेमाचे रोपटे मनामनात रुजवावे


जगण्याने छळले म्हणून सरणावर न चढावे

सरणातल्या लाकडालाच जगण्याची मशाल बनवावे


रंग , जात , धर्म विसरून सर्वांनी एकत्र यावे

माणसाला माणसाशी जोडणारे माणुसकीचे गाणे गावे


सर्वांच्याच अंगी एकतेचे बळ भिनावे

दोन्ही बाजू सारख्याच असतील असे नाणे घडवावे


माणूस म्हणून जगावे, माणूस म्हणून जगू द्यावे

'आपण' 'आम्ही' ला जपावे 'मी 'ला बाजूला सारावे


तुझ्यासाठी मी, माझ्यासाठी तू हेच चिंतावे

प्रेमाची शाई, आनंदाची लेखणी करून सुंदर क्षणांना टिपून ठेवावे


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational