STORYMIRROR

Shanti Gurav

Classics

3  

Shanti Gurav

Classics

आला श्रावण

आला श्रावण

1 min
268

आल्या सरसर श्रावणाच्या नाचऱ्या साजऱ्या सरीवर सरी

मनामनात आनंदाच्या ऊर्मी उठल्या ऊरी

     सुरू जाहला आनंद सोहळा तनामनाचा

     चराचरात भरला जोश चैतन्याचा

उन्हापावसाचा खेळ करत आली श्रावण सर

पानाफुलांना आला अनोखा बहर

     हातात हात घालून आले सणवार

     व्रतवैकल्यांची झाली भरमार

बहीण भावाच्या नात्याचे पवित्र सुंदर बंधन

साजरा होतो पावन सण रक्षाबंधन

     गोकुळाष्टमीचा उत्साह न्यारा

     कृष्णजन्माच्या आनंदाने रंगून जातो संसार सारा

बांधल्या जातात हंडीवर हंडी

बालगोपाळ जोशात फोडतात दहीहंडी

     नागोबांपासून संरक्षणाची मिळाली हमी

     स्त्रिया करतात मोठ्या उत्साहाने साजरी नागपंचमी

आली मंगळागौर नटून थटून

माहेरच्या ओढीने नवविवाहित मुलींचे मन गेले रंगून

     कोळ्यांचा सण मोठा कृतज्ञतेचा हा नारळी पुनवेचा

     दर्याचा राजा मान करतो सागराचा अर्पून नारळ सोन्याचा

नभाने बांधली इंद्रधनुष्याची कमान

सोनेरी केशर शिंपीत आला श्रावण

      अवखळ पावसाबरोबर बेधुंद झाला वारा

      श्रावणाच्या आगमनाने हर्षित झाला निसर्ग सारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics