STORYMIRROR

Shanti Gurav

Tragedy

3  

Shanti Gurav

Tragedy

आई ग

आई ग

1 min
192

अग आई ! ऐकतेस का ?

माझ्याशी थोडे बोलतेस का?

काल मी काहीतरी ऐकले

ऐकूनच किती मी घाबरले...

मला तुझ्यापासून दूर करणार...

तू माझ्याशिवाय कशी राहणार?

आत्ताच तर मी तुझ्या उदरात आले..

एवढ्यातच सगळ्यांना नकोशी झाले?

किती मी आनंदात होते...

मला या जगाला पाहायचे होते...

तुझ्या हातांवर झुलायचे होते...

तुझ्या पदराआड लपायचे होते...

बाबांचे बोट धरून चालायचे होते...

आजोबांबरोबर खेळायचे होते...

पण आता हे कसे घडणार?

तुझी तर माझ्यापासून सुटका होणार...

मी जगात येण्याआधीच माझी स्वप्ने भंगणार...

तुम्ही मला उदरातच संपवणार...

आई , मला दूर लोटताना तुला काहीच नाही का वाटणार?

माझ्या नसण्याचे दुःख थोडंस ही नाही होणार?

अगं ! इतकी निष्ठुर बनू नकोस...

मला या जगात येण्यापासून थांबवू नकोस...

मी तुझा कुलदीपक नाही तर कुलदीपिका बनेन....

आपल्या घराण्याचे नाव मोठे करीन...

फक्त मला जन्माला येऊ दे...                   

 हे एकच जीवनाचे दान मला दे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy