STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

पिले केंव्हाच उडाले घरटे उदास

पिले केंव्हाच उडाले घरटे उदास

1 min
275

पिले केंव्हाच उडाले घरटे उदास

उरला आता केवळ व्हिजनवास 

ते गेले परंतु तू जायला नको होत

सावलीसारखी सोबत करायचीस 


गेले ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी

मंतरलेले ते दिवस होते माप ओलांडून

उंबऱ्यात आली होतीस सर्वार्थाने समर्पित

होत जीवन तुझं ,भरल्या घरात दरवळलीस 


किती राबलीस ग , सगळं केलंस न कुरबुरता

दुःखात खंबीर उभी राहिलीस पाठीमागे प्रत्येकवेळी

जातील हो हेही दिवस दुःख काय घर बांधून राहत का ?

म्हणालीस तेंव्हा कुठून एवढं बळ, शहाणपण मी म्हणालो होतो


आता काय मरण येत नाही म्हणून जगत राहावं

जे जे होईल ते ते पाहावं , तू तर गेलीस योग्यवेळी

तुला कसं कळलं ग नेमक्यावेळी एक्सिट घेणं नाहीतर मी

जन्मभर माझं माझं कबाड ओझं आणि आता हे अश्वथाम्याचं जिणं


परमेश्वरा ! हेच दिवस दाखवायाचे होते तर तुला

भगवंता ! उचल रे आता नाही सहन होत हे सगळं

कितीतरी वेळ तो मनाशीच बडबडत होता म्हातारबा

काय करणार बिचारा लेक सासरी गेली, मुलगा परदेशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy