STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Tragedy

3  

Shravani Balasaheb Sul

Tragedy

मी पाहिले...!

मी पाहिले...!

1 min
341

हृदयास मी हृदयात हृदयाच्या

हळूच आज डोकावताना पाहिले

आठवणींत तुझ्या मनास माझ्या

जेव्हा मी हरवताना पाहिले

कोमेजल्या फुलास मी

उत्स्फुर्तपणे फुलताना पाहिले

विझल्या दिव्याच्या ज्योतीस

प्रकाश देत तेवताना पाहिले

सुकल्या चेहर्‍यावर मी

अश्रू ओघळताना पाहिले

आटलेल्या नदीस मी

हुंदके देत रडताना पाहिले

स्वरांच्या संगतीविन सजलेले

सख्या रे संगीत पाहिले

स्मृतीरंगांत रंगून तुझ्या

आसवांना माझ्या रंगीत पाहिले

हृदयाची कवाडे क्रूरतेने

बंद करूनी पाहिले

विसरून तुला विश्वात माझ्या

मी विरुनी पाहिले

विरहाचे दुःख थोडेसे मी

तुझ्याही नयनात पाहिले

सत्यात सुटली सोबत जरी

महालास राजाराणीच्या मी स्वप्नात पाहिले

असहाय्यतेच्या धाग्याने स्वतःचे

ओठ मी शिवताना पाहिले

डोळ्यातले दिपक फुंकर मारून

स्वतःस मी विझवताना पाहिले

तुझ्या दिशेने येता येता

मजला मी दिशाहीन पाहिले

आशेत तुझ्या अस्वस्थ होता

मजला मी आशाहीन पाहिले

वाटेत तुझ्या वाट पाहत उभी

तू न एक नजर पाहिले

समुद्रास सुकवण्या आले जे

बुडताना मी ते पदर पाहिले...…!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy