STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Others

3  

Shravani Balasaheb Sul

Others

आज आठवणींच्या झोक्यावर

आज आठवणींच्या झोक्यावर

1 min
197

गतकाळीचा वारा जेव्हा वाहत वाहत येतो

वर्तमानच्या क्षणांचा ताबा तो घेतो

कधी आठवणींचे आगमन असते प्रत्येक श्वासात

जीवंत होतो भुतकाळ स्मृतींच्या सहवासात

एकटेपणात रंग भरण्या आठवणींचाच असे आसरा 

आज आठवणींच्या झोक्यावर झुलून घेते जरा 


कधी हसवणारे कधी रडवणारे ते क्षण सारे मोलाचे

हृदयाच्या एका कप्प्यात वास्तव्य शांत कोलाहलाचे

अनोख्या जगी जगताना त्या वेळ सुसाट किती धावते

अधूनमधून तिथे गेल्याविन मजला न राहवते

आठवणींची आठवण आली अंतःकरणाच्या द्वारा

आज आठवणींच्या झोक्यावर झुलून घेते जरा


दिस गेलेले स्मरताना कळे आजवरचा प्रवास

कधी वेळेच्या परतीचा का मनास होई भास

भानावर येई जेव्हा मन किंचित होई व्याकुळ

स्मृती त्या न वर्तमान आता ही जाणीव त्याचे मूळ

नयनी अश्रू ओठी हसू हा भावनांचा मेळ न्यारा

आज आठवणींच्या झोक्यावर झुलून घेते जरा


स्मरणांची साथ कधी भेटल्यावर न सुटते

ते घट्ट न नाते आयुष्यभर न तुटते

कालांतराने जीवनातून लुप्त होती जे चेहरे

गेले क्षण स्मरताना तयांशी भेटी गाठी बहरे

प्रवाहात वाहता काळाच्या दिसला मला किनारा

आज आठवणींच्या झोक्यावर झुलून घेते जरा 

 


Rate this content
Log in