STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Inspirational Others

3  

Shravani Balasaheb Sul

Inspirational Others

वादळ

वादळ

1 min
140

आज अंतरी उठले, पुन्हा शांत वादळ

जशी स्थिर तरुंच्या, पर्णांची ती सळसळ

तट तटीनीचा अचल, जळ वाहे कसे खळखळ

तशीच मीही स्तब्ध, मनी विचारांची धावपळ

त्या अशांततेत होई, जीवाची तळमळ

अस्वस्थ करे चित्त, काही क्षणांचा तो गोंधळ

कधी विचार होई निश्चल, पाहून हृदयाची कळवळ

स्वतःसाठीच तेव्हा, व्यक्त होई हळहळ

क्षण काही सरता मात्र, जाणवते संघर्ष हा अटळ

तोंड दिल्याविन त्यास, काढणार कसा पळ

अंतःकरणाला सोसावी लागते, भावनांची झळ

भावांचे घाव पेलवतानाच, वाढे हृदयाचे बळ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational