STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Inspirational Others

3  

Shravani Balasaheb Sul

Inspirational Others

मन म्हणते पुन्हा पुन्हा

मन म्हणते पुन्हा पुन्हा

1 min
150

साहित्याच्या अतूट माळेत, एक मोती स्वतःचा माळून

मन म्हणते पुन्हा पुन्हा , शब्दांचे मनस्वी दास होऊया

कलासृष्टीस समर्पित होऊन, नाविन्याची वाट धरून 

मन म्हणते पुन्हा पुन्हा, अक्षरांचा विश्वास होऊया 


संवादाचे धनुष्य अन्, विचारांचे बाण लेखणी

मन म्हणते पुन्हा पुन्हा, न्यायाचा आक्रोश होऊया 

वेदनांचे पाषाण वेचून , धाडसाची ईमारत रचून 

मन म्हणते पुन्हा पुन्हा, मनामनाचा रोष होऊया


निशाणा साधून वेदनांचा, दोर अडकवून संवेदनांचा

मन म्हणते पुन्हा पुन्हा, यातनांनी भाषा होऊया 

रात्रीचे चांदणे टिपून, पहाटेची पावले गिरवून 

मन म्हणते पुन्हा पुन्हा, अंधाराची आशा होऊया


प्रेमबंधात बांधून भाव, प्रेमरंगे नखशिखांत रंगून 

मन म्हणते पुन्हा पुन्हा, राधा हरीची रास होऊया 

शब्दांच्या कुंचल्याने कागदावर रंगवून मनपटल

मन म्हणते पुन्हा पुन्हा, भाव बंधांचा श्वास होऊया


शब्दसुमन अर्पून चरणी, ईश्वराची करून विनवणी

मन म्हणते पुन्हा पुन्हा, संतांचे अभंग होऊया 

मनात न मावले, पानांवरती स्वच्छंद वाहिले

मन म्हणते पुन्हा पुन्हा, स्वतःचे ते अंतरंग होऊया 


शब्दांची पावले चालून, शब्दांना श्वासात माळून 

मन म्हणते पुन्हा पुन्हा, भावनांची वाट नवी होऊया

वास्तवाचे पाश तोडून , कल्पनेचे गाव गाठून

मन म्हणते पुन्हा पुन्हा, काव्यवेडा कवी होऊया 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational