STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Others

3  

Shravani Balasaheb Sul

Others

मायेची मिठी

मायेची मिठी

1 min
160

सजे अक्षरांची गुंफण दोऱ्यादोऱ्यात माळून

माय मराठीच्या रुपावर मन जाई माझे भाळून

ग्रंथ गीतांची ओवी, शब्दसुमनांची होळी

माय मराठीची बोली, तान्ह्या बाळाची झोळी 

नदी सागरात वाहणारे, पारदर्शक निर्मळ पाणी 

तशी मराठीच्या पदरी वाहे, संतांची पवित्र वाणी

कथा कवितांच्या ठायी आहे, शिकवणीची शिदोरी थोरामोठ्यांचे चरित्र , शिवबाच्या पाळण्याची दोरी

मराठीच्या रोमी भिनलेला, मृदगंधित वारा 

भजन कीर्तन जपते, अध्यात्मिकतेची परंपरा

साहित्याची अखंड माळ, महाराष्ट्राचे तोरण आहे

मराठीचा मायाळू स्पर्श, या धरतीचे तारण आहे 

आज कौतुकसोहळा, माझ्या माय मराठीचा

शब्दांचे पसरून बाहू, क्षण हा मायेच्या मिठीचा


Rate this content
Log in