STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Classics Others

3  

Shravani Balasaheb Sul

Classics Others

मीरा प्रेमबावरी

मीरा प्रेमबावरी

1 min
193

सावळ्या च्या स्नेहात 

सजवून समर्पणाच्या ओळी

वीणा घेऊन हाती मीरा 

खेळे श्रीरंगाची होळी

चालून तिची पावले 

भूमंडली आला श्रीहरी

सप्तसूर ते सूरमयी 

चाहुलीेचा त्याच्या ठेका धरी

दंग होऊन रंग लेऊन 

रंगून गेली भक्तिरंगात

गीत माळून प्रेमभावे 

कृष्ण गायीला आर्त रागात 

कर्णमधुर चित्तवेधक 

शब्दगंध मनमोहक

मनमोहनास साद घाली 

शब्दसुमन चित्तरोचक 

जीवाला ओढ लावी 

अधरावर ती बासरी 

दर्शनास आतुर हरीच्या 

मीरा प्रेमबावरी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics