STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Abstract Others

3  

Shravani Balasaheb Sul

Abstract Others

खरंय

खरंय

1 min
167

खरंय... कुणाचं कुणावाचून काही अडत नाही

आठवणींचा फेर मात्र पाठलाग कुणाचा सोडत नाही

आयुष्याला नसली तरी मनाला निकड असते

शिंपल्याच्या जीवाला मोत्याची च निवड असते

मन रमलं नाही की आयुष्यही जरा नाराज असतंय 

अजाण तरी किती बनावं नजरेला सारं चित्र दिसतंय 

मग मनाचं सांत्वन करावं अन् आयुष्याला समजावं

की दोघांचं मन राखून नियतीच च मन बदलावं

विचार करायला सहज पण विचार केला तर थट्टा आहे

नशीबाचा काय डाव मोडणं त्याला अमर असण्याचा ताठा आहे 

मग कर्माप्रमाणे नशीब घडतंय की नशिबाप्रमाने कर्म घडतंय 

की वळण पाहून वाट बदलायला नशिब नुसतं कोड्यात पडतंय 

वाट बदलताना कदाचित मनात वाट चुकायची धास्ती राही 

साशंक आहे नशीब ही त्याला पूर्णत्वाची शाश्वती नाही 

स्वतःच्या डावात स्वतः ही मोहरा बनलंय 

नशिबाचं ही अटळ नशीब लिहिलं गेलंय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract