STORYMIRROR

Anita Bodke

Abstract

3  

Anita Bodke

Abstract

होते कळी अभागी

होते कळी अभागी

1 min
286

होते कळी अभागी फुलता मला न आले

वार्‍यापरी नभाला भिडता मला न आले


आजन्म रोखलेले मी पाट आसवांचे

तू शपथ घातली अन् रडता मला न आले


तो फक्त एक होता हृदयास भावलेला

प्रेमात मग कुणाच्या पडता मला न आले


तो भेटताच हसतो आधीच बोलण्याच्या

येऊन रागसुद्धा चिडता मला न आले


देऊन दीप गेला अंधार सोबतीला

मी एक ज्योत होते विझता मला न आले


घे, जा म्हणे भरारी उघडून पिंजर्‍याला

तू पंख कापले अन् उडता मला न आले


पाहून वाट मिटल्या या पापण्या कधीच्या

तू साद घातली पण उठता मला न आले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract