मंडळ...!
मंडळ...!
मंडळ म्हंटल की
बाल मंडळ,तरुण मंडळ
अशी अनेक मंडळ
नजरे समोर फेर धरतात
त्यांचे नियम फतवे
उद्धिष्ट,ध्येय कार्य
आखणी ,रुपरेखा
आणि अमल बजावणी समोर येत
अनुभव जाईल तिथे
सारखेच पदरी पडतात
मंडळ मोडतात आणि तयार होतात
मांडवली फंडवली सार पार पाडतात
पण खर सांगू
आता नवीनच प्रकाश पडला
मंडळ म्हणल की पहिल्या सारखं
मंडळ डोळ्या समोर येत नाही
काही तरी
वेगळेपण आताशा जाणवत
मंडळ म्हंटल की
स्पष्ट मंडल ऐकू येत ,दिसत,जाणवत
मग शिस्त आपोआप
डोळ्या समोर उभी ठाकते
आणि त्याग परिश्रम
याचे गोडवे गाऊ लागते
मन भारावून जात
आपली आपल्याला जण होते
देश भक्तीच वार संचारत
या देशात जन्मल्याच समाधान मिळत
काहीतरी दुसऱ्या साठी
आपणहून करावं वाटत
खारीचा वाटा उचलाव वाटत
देशाचं ऋण फेडाव वाटत
खरच थोडी हवा बदलली
थोडी प्रगती झाली
इतरांची काळजी वाटू लागली
देशासाठी राबण्याची तयारी घडू लागली
मंडळ शब्दाची जागा
मंडलाने घेतली आणि
मंडलाची व्याप्ती वाढता
एकतेची मशाल पुन्हा पेटली
नवी दृष्टी प्राप्त झाली
विकासाची नांदी झाली
प्रगतीची सुरुवात झाली
वाटते सुवर्ण काळाची पहाट झाली...!
