STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Romance Others

3  

Shravani Balasaheb Sul

Romance Others

तू

तू

1 min
133

तू चाहूल चांदरातीची

तू उधळण स्वच्छंद प्रितीची

तू मुक्या शब्दांची साद

तू गीतास हवासा नाद

तू सुगंध स्मरण सुमनांचा

तू अबोल बोलकी वाचा

तू नजरेत गोठता पाऊस

तू या जन्मीची अपुरी हौस

तू मोह वेड्या मनाचा

तू सूर्य नव्या दिनाचा

तू नक्षत्र आठव तारकांचे

तू ठिकाण हळव्या स्मारकांचे

तू देहास बिलगता वारा

तू स्पंदनांची निरंतर धारा

तू प्रश्न बिन उत्तराचा

तू स्पर्श जणू अत्तराचा

तू स्वर्ग जसा भुईवर

तू मुकुट जसा डोईवर

तू थेंब मुखावर रुळणारा

तू अर्थ मलाच कळणारा

तू नजर माझ्या नजरेतली

तू गुंफण जणू गजऱ्यातली

तू खवळत्या सागरास किनारा

तू सरितेची सांधण तो झरा

तू माझ्यापासून माझ्यातले अंतर

तू हृदयावर कोरलेले अदृश्य अक्षर

तू भावनांचे विस्तृत पंख

तू काळजात सलता एक डंख

तू आयुष्याच्या आरंभीचा शंख

तू हृदयाचे ठोके असंख्य

तू दोर अश्रूंचे मोती विणनारा

तूच बंध मला बांधणारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance