मला थोड़ा वेळ लागेल
मला थोड़ा वेळ लागेल
तुला समजून घ्यायला,
तुझ्यात सामावून जायला,
मला थोड़ा वेळ लागेल
तुझे शब्द,तुझे काव्य,
मनात उतरून घ्यायला,
मला थोड़ा वेळ लागेल
स्वरात तुझ्या भिजायला,
स्पर्श तुझा माझ्यात भिनायला,
मला थोड़ा वेळ लागेल
तुला समजून घेतल
जाणून ही घेतल
अन्तरंगात तुझ्या स्वत :ला,
व्यापुन घेतल पण
तू मात्र म्हणालास,
तुला माझी मानन्यास,
तुझ्या सोबत स्वप्न सजवन्यास
मला थोड़ा वेळ लागेल....
समाप्त

