रिवाज
रिवाज
पैशात बोलण्याचा येथे रिवाज आहे
लाचेस मागण्याचा येथे रिवाज आहे
सख्खा तुझाच भाऊ बोलवयास भारी
गरिबास टाळण्याचा येथे रिवाज आहे
दोघात ठेव राणी माझी तुझी कहाणी
संसार मोडण्याचा येथे रिवाज आहे
पूरास आसवांच्या रोखू कसे कळेना
हासून बोलण्याचा येथे रिवाज आहे
पेटून खाक झालो वणव्यात जीवनाच्या
प्रेतास जाळण्याचा येथे रिवाज आहे
