व्यथा शेतकऱ्यांची
व्यथा शेतकऱ्यांची
वर आभाळ कोरडं
मिळेना पाणी शेताला
कर्जापायी बळीराजाने
घर काढलं विकायला
कर्ज काढुन शेतीवर
घेतल बियाणं विकत
निघालं बोगस ते
नशिबाने केला घात
गहाण ठेवुन घरदार
शेतीपायी कर्ज काढले
पीक आली जोमात
शिवार नटून आले
केला निसर्गाने कहर
पीक गेली सारी वाहुन
नशिबी आलं पुन्हा तेच
बसलोय हताश होऊन
कर्जापायी रोजच तगादा
आता गोष्ट झाली रोजची
काय करावं काही कळेना
कशी परतफेड करावी कर्जाची
मिळती नुसती आश्वासन
निवडणुकीच्या तोंडावर
कोण वाली शेतकऱ्यांचा
कोण फेडेल कर्जाचा डोंगर
