STORYMIRROR

kishor chalakh

Classics

2  

kishor chalakh

Classics

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
479


माझ्या मनातला हा पाऊस

आला बघा प्रेम उधळीत 

आलं वृक्षाला नवचैतन्य

बहरुन आली ही जोमात


 माती पसरत जाते सुगंध 

 पानालाही येते संजीवनी

बहरून जातो जीव सारे

क्षण सुखाचा येते जीवनी


 फुटतोय जीव प्रत्येकाला

जसा फुलतो वृक्ष डौलाने

ऋतू देऊन जातो संदेश

जगू हे आयुष्य आनंदाने


देतो संदेश पाऊस आपणास

गेले ते सगळं जा विसरून

सुरुवात करू चला नव्याने

घालू दुःखालाच पांघरून


शिकवितो निसर्ग आम्हास

आम्ही असतोय बदलत

तुम्ही घ्या बदलून स्वतःला

नवं आयुष्य जगा हसत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics