रंग प्रेमाचा
रंग प्रेमाचा
1 min
377
प्रेमा तुझा रंग कसा
जीव तुझ्यात रंगला
कळले न मला पण
मन माझा न राहिला
तीला पाहताक्षणीच
पडलो तिच्या प्रेमात
त्याच दिवशी ठरवलं
तीच येईल जीवनात
वाटलं सांगावं तिला
पण कसं ते कळेना
तिला पाहिल्याविना
मला पण करमेना
ती नाही दिसली तर
दिवस वाया जायचा
तिच्या आठवणीनं
मन सुन्न व्हायचा
प्रेमाचा हा रंग कसा
मी कसा पडलो प्रेमात
सात जन्माची असेल गाठ
म्हणून तीच आली हृदयात