जाणता राजा
जाणता राजा
1 min
514
जाणता राजा शिवछत्रपती
साक्ष देते पाने इतिहासाची
रखरखती त्यांची तलवार
कीर्ती सांगते माझ्या राजाची
शिवरायांच्या कार्याची गाथा
गडकिल्ले सांगती इतिहास
राजकारणी अडकुनी आज
गडकिल्ले झाली भकास
जाती येती निवडून
लक्ष नाही कोणाचे
आश्वासन देती सारे
थापा मारती पक्षाचे
गडकिल्ले कर्तृत्वाची खाण
देते साक्ष बलिदानाची
इतिहासी जमा झाले
कोणाला न काळजी त्याची
आव्हान आहे सर्वाना
उचला वाटा सिहांचा
गडकिल्ले राष्ट्रीय संपत्ती
ध्यास धरू विकासाचा
