बळीराजा
बळीराजा
1 min
330
बळीराजा
पोशिंदा हा
कष्ट त्याच
जरा पहा
दिन रात
तो राबतो
जगी साऱ्या
हा पोसतो
ना गाऱ्हाणं
ना तक्रार
फक्त लक्ष
हे शिवार
कोणी नाही
त्याला वाली
आश्वासन
ही मिळाली
हमी नाही
पावसाची
जिद्द आहे
करण्याची
राजा माझा
दुःखी आहे
सुखाची तो
वाट पाहे
कोण देई
त्यास न्याय
दूर होई
हा अन्याय
