STORYMIRROR

kishor chalakh

Inspirational

4  

kishor chalakh

Inspirational

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
213


येरे येरे पावसा

जीव झाला कासावीस

धरणी झाली तयार 

लागली तुझीस आस


शेतकरी माझा झाला सज्ज

प्रतीक्षा आहे पहिल्या पावसाची

पेरणीला होईल आता सुरुवात

कामे सुरू होतील शेतीची


पूर्वतयारी झाली सुरु

सोबतीला माझ्या बैलजोडी

संगत आहे निराळी यांची

जीवाला लागते गोडी


पडताच मग पाऊस

शेतीला येईल जीव

हिरवाईने नटून जाईल

शेतीची ही शिव



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational