STORYMIRROR

kishor chalakh

Others

4  

kishor chalakh

Others

माझे घर

माझे घर

1 min
545


किती किती सुंदर हो 

असे माझे हे घर 

मज आवडे मनापासून 

माझे हे मन मंदिर 


आई ही माझी 

आहे खुप खास 

भरविते मला हो 

रोज प्रेमाचा घास 


बाबा हे माझे 

शिकवितात रोज मला 

देऊन धडे शिक्षणाचे 

सांगतात जगण्याची कला 


भाऊ हा माझा 

खेळतो  माझ्यासोबत 

सोबतीला असतो 

नेहमी हसत खेळत 


आजी ही माझी 

सांगते मज गोष्टी गाणी 

झोप लागते खुशीत 

अशी तिची मधुर वाणी 


असे हे माझे घर 

अन नाती इथं प्रेमाची 

मिळते प्रेम अन माया 

कमी नाही मला कशाची 



साहित्याला गुण द्या
लॉग इन