kishor chalakh

Others


3  

kishor chalakh

Others


रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min 3 1 min 3

घेऊन आनंदी क्षण अनेक 

आला सण रक्षाबंधनाचा 

बांधते बंधन भाऊराया 

बंध बांधूनी प्रेमळ नात्याचा 


येते बहीण या सणाला 

घेऊन प्रेमधागा प्रेमाचा 

लाभो सदैव सौख्य तीला 

आशीर्वाद आहे भावाचा


भाऊ- बहीण हे नातं 

आहे एक अनमोल देणं 

रक्षाबंधन अन भाऊबीज 

पवित्र नात्याचं हे लेणं


आईसारखीच असते बहीण 

जी लावते लळा भावास 

मस्ती मज्जा अन खेळात 

असतात हे दोघे हमखास 


अतूट नाते हे भावाबहिणीचे 

साक्षीला सण रक्षाबंधनाचा 

असच कायम राहावी नाती 

हाच संदेश आहे या सणांचा


Rate this content
Log in