STORYMIRROR

kishor chalakh

Drama

2  

kishor chalakh

Drama

पावसातील एक रात्र

पावसातील एक रात्र

1 min
592

अंधाऱ्या राती गाडी पडली बंद

स्मशान शांतता होती रस्त्यावर

कडाडली वीज खूप जोरात

घाबरलोच मी मग क्षणभर


सुरु झाला सोसाट्याचा वारा

झाली सुरुवात पावसाला

गाडी ठेऊन रस्त्यावर

शोधू लागलो आसऱ्याला


भुंकणे सूरु होते कुत्र्याचे

मी पार गेलो घाबरून

वाजला माझा फोन

गेलोच मी दचकून


हिम्मत करून कशीतरी

गेलो मी गाडीजवळ

दुरुस्त करून गाडी

पळत आलो झाडाजवळ


आला तेवढ्यात माझा भाऊ

सोडला सुटकेचा श्वास

गेलो घरी मग मी सोबत

अशी आठवणीतील रात्र खास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama