भाव माझ्या अंतरीचे
भाव माझ्या अंतरीचे
भाव माझ्या अंतरीचे न जाणीले कधी कुणी कसे
दुःख बहुत वाहिले नयनात आसवास त्या थांबुनी द्यावे कसे...
झेलल्या गारा देहाने या न पाहिले कधी कुणी कसे
रक्तबंबाळ जखमा वाहतच राहिल्या रक्तास त्या मी थांबुनी द्यावे कसे...
भाव माझ्या अंतरीचे दाखवू कुणास मी आज कसे
दिल्या यातना ज्यांनी हृदयास या माफ त्यांना मी करू तरी कसे...
आहे नाते जिव्हाळ्याचे बंध नात्यांचे ते मी तोडू कसे
तोडू तर तेच पाहतात नाती मग नाते त्यांच्याशी मी जोडू कसे...
वाटे नको हा वाद मजला तोंड कुणाचे मी बंद करू कसे
अवहेलना माझीच होतेय सारखी त्याच आपल्यांना आपले मी मानू कसे...
