प्रिय बापू
प्रिय बापू
प्रिय बापू,
अनमोल तुमचे विचार सोडून
प्रतिकांनाच किंमत आली,
तीन माकडांच्या संकल्पनेची
माणसांनीच गंमत केली.
सत्याग्रहा ऐवजी बापू
सत्तेचा आग्रह वाढला,
पुतळा भव्य उभारुन
तुमचा मार्ग मात्र सोडला,
तुमच्या नावाची टोपी घालून
अखेर सारा देश दमला,
दांडीयात्रेचा भारत अलीकडे
दांडीयातच रमला!
