झुंड
झुंड


ठाकले असे सामोरी
एकास कित्येक भिडले
घायाळ शरीराच्या माथ्यावर
जणू गिधाडांचे जत्थे आले
बाजारी मी बसलेला
वेदनांची पथारी पसरून
जशा लाटा वाहतात
बंधने सारी विसरून
या निष्ठूर झुंडीचे
कृत्य षंढपणाचे ठरले
जणू अधाशी श्वानांनी
बंदिस्त वाघास घेरले
नाही इथे सख्य कोणी
कवच अंगी धरणारा
आपलाच लढा ठरावा
कायम पुरून उरणारा