STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Comedy

3  

Tushar Chandrakant Mhatre

Comedy

उद्यापासून जिमला जायचं!

उद्यापासून जिमला जायचं!

1 min
11.9K

“पोटाचा घेर घरासारखा वाढलाय आणि

दिवसभर काय नुसतं लोळत पडायचं?”

असलं जळजळीत कानावर नको म्हणून

ठरलं, उद्यापासून जिमला जायचं!


“हे नको, ते हवं म्हणत नवे पदार्थ शोधताय

सदानकदा काय नुसतं चमचमीत खायचं?”

हे असलं झणझणीत ऐकण्यापेक्षा

ठरलं, उद्यापासून जिमला जायचं!


“शेजारचे अमुक पाहा, ऑफीसातले तमुक पाहा

आणखी किती किलो वजन वाढवायचं?”

हे असले वजनदार शब्द टाळण्यासाठी

ठरलं, उद्यापासून जिमला जायचं!


“काल काहीतरी ठरलं होतं तुमचं,

काय झालं परवाच्या निश्चयाचं?”

हे असलं ऐकण्यापेक्षा, आज नको पण

ठरलं, उद्यापासून जिमला जायचं!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy