STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Others

4  

Tushar Chandrakant Mhatre

Others

दोस्तहो...!!!

दोस्तहो...!!!

1 min
23.6K

ओंजळीत फुलांचा अजून वास किती

दोस्तहो, हे तुमचे आभास किती?


कालची रात्र चमकत्या नभाची

आजचे आकाश उदास किती?


मनातल्या प्रवाहाला थांबवू कसे

आठवणींचा हा प्रवास किती?


अवखळ दिवसांचे क्षण आपले

स्मृती जपण्याचे प्रयास किती?


ओळखीचे होते तेव्हा सारे

आता अनोळखी आसपास किती?


ही कसली मैत्री? या कसल्या भावना

विरहाचा हा त्रास किती?


सोबतीला जरी तुमची सावली

मला उन्हाचा हव्यास किती?


ओंजळीत फुलांचा अजून वास किती

दोस्तहो, हे तुमचे आभास किती


Rate this content
Log in