STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Inspirational Others

3  

Tushar Chandrakant Mhatre

Inspirational Others

बिनचेहऱ्याचा समूह

बिनचेहऱ्याचा समूह

1 min
12K

जगण्याच्या पारावरती

जमतात प्रवाही व्यक्ती

पाचोळ्यांतून धुरळा उठतो

अशी अनामिक शक्ती

      सृजनाची चर्चा इथे

     अशी निरंतर होते

      व्याप असूद्या कितीही

      मिळूनी तडीस जाते

व्यक्तीमत्वांच्या आडोशाने

एकीत उतरते स्वत्व

सहाय्याने एकमेकांच्या

कर्मात दिसते तत्व

     बिनचेहऱ्याच्या समूहाला

     निखळ सुंदरता येते

     या हृदयीचे त्या हृदयातून

     गीत मनोहर गाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational