हसरे दु:ख
हसरे दु:ख
या चेहऱ्यावरच्या रंगांनी
हसण्याचे छंद दिले
पण माझ्या डोळ्यांतूनी
वेदनांचे मार्ग ओले
संघर्षाची ओढ अशी
जगण्याचे वेड असे
बघणाऱ्यांच्या गर्दीतही
निर्मनुष्य हे भासे
दुनियेच्या कसरतीतून
ओढीतसे मला कोणी
स्वत:शीच झगडताना
मीच होतो माझी कहाणी
हे हसरे दु:ख असे
घेऊनी मी चालतो
टाळ्यांच्या कडकडाटात
उ:शाप पोटी घालतो