STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Romance

3  

Tushar Chandrakant Mhatre

Romance

हृदयाची वैद्य

हृदयाची वैद्य

1 min
11.5K

हृदयाची वैद्य माझी, तू हसत राहा

धडधडीस कारण तू सतत राहा


साधे, अथांग निरागस डोळे

विचार, स्वप्न त्यात कसले

अर्थही त्याचा कोणा नकळे

माझ्या हृदयी तू वसत राहा


पैलतिरी साधे घरटे माझे

सोबतीने झाले हलके ओझे

मधुर केले जीवन माझे

अंतरी माझ्या तू वसत राहा


वेदनांना तू हसरे केले

भावनांचे हे प्रवाह ओले

वैद्यापरी तू इलाज केले

संगे तू अशी सतत राहा


हृदयाची वैद्य माझी, तू हसत राहा

धडधडीस कारण तू सतत राहा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance