भयाण अंधार
भयाण अंधार


ही कुणाशी झुंज आहे? हा कसला यल्गार आहे?
जो निवडला मार्ग त्याने तो भयाण अंधार आहे
ते कुठे आता बेफिकीर धुराचे लोट आले?
हा नकोशा सवयीचा सहज स्विकार आहे
रंगलास ज्यात तू, अंतरंगही व्यापले त्यांनी
हलके वाटले त्याने तरी, तो जीवाचा भार आहे
लागला आहे तुला व्यसनाचा शौक कसला?
शरीर सोडलेस तरी आत्म्यावर अत्याचार आहे
सडल्या कित्येक पिढ्या, गाडल्या नादाने किती?
या झगमगत्या जीवनाचे परतीचे बंद दार आहे
विकली कितीदा त्यांनी घराची अब्रूही परंतू
कोणी न केली चर्चा... ही सवय दारोदार आहे
का बदफैली जगाने झाकले आहेत डोळे?
हा जहरी विषाचा, जबरी व्यापार आहे
ही कुणाशी झुंज आहे? हा कसला यल्गार आहे?
जो निवडला मार्ग त्याने तो भयाण अंधार आहे