STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

आम्ही कामगार

आम्ही कामगार

1 min
22.9K

माझ पोट हातावर,

मी आहे कामगार.

रक्त वाहत घामावानी,

डोक्यावर जगाचा भार

बांधल्या किती इमारती,

कारखाने चालवले किती...


उन्हातान्हातुन राबताना,

नाही आम्हा कशाचीच भीती.

फुलवल्या बागा किती,

आम्ही रक्ताच पाणी करून.

लोकं फळतात, फुलतात,

आम्ही जातो असेच मरून....


नाही खंत बाळगली,

नाही प्रश्न कधी केला.

नांगराच्या बैलावानी इथ,

जीवन प्रवास हा केला.

 नाही नोंद आमची कोठे,

नाही उल्लेख कोणी केला....


नाही न्याय कोणी दिला,

ह्या भुकेलेल्या जिवाला.

 नाही ह्रा दुनियेचा वाली,

कामगारा शिवाय कोणी.

अन्याय करू नका आम्हावर,

आहोत, आम्हीही, तुमच्यातले कोणी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy