बालपण
बालपण
1 min
54
जीवनातील पाऊल पहिलं,
अनुभव हे आयुष्यातील.
एक एका संस्कारांनी मी,
स्वतःलाच मजबूत केल.
संस्कार बालपणीचे मोठे,
पायरी आयुष्यातील पहिली.
पुंजी जीवनभरची माझ्या,
माय बापाची ती सावली.
बालपणीची आठवणच,
सोबत राही जीवनभर.
माझ्या पुढील जीवनासाठी,
हेच ठरणार करगर.
बालपणीचा काळ सुखाचा,
येणार नाही तो कधी पुन्हा.
जुनं तेच सोन हेच खर,
विसरता येणार नाही ना.
बालपणीची आठवण ही,
राही आयुष्यभर मनात.
येणारच नाही ते दिवस,
हिच आयुष्यभरची खंत.
बालपण हे किती सुंदर,
आनंदाचा निखळ झरा.
मातापित्यासोबत भोगला,
धरणीवरच स्वर्ग खरा.
