STORYMIRROR

Vasudha Naik

Tragedy

4  

Vasudha Naik

Tragedy

खरं सांग ना

खरं सांग ना

1 min
258

कोरोना महामारीने मानव घात केला

आई बाबांना जगातून घेवून गेला.....


खरं सांग ना बाप्पा का निष्ठूर झाला

मला त्या बाप्पाचाच खरं राग आला...


दीन दुबळे आम्ही ,लहान आम्ही सारे

आमचेच आई बाबा का रे तुला प्यारे...


 अनाथ आश्रमात आता राहतोय खरे

जे,जसे मिळेल ते खातोय,लेतोय बरे..


आम्हांला जपतात तेथील ताई, दादा

चांगल्या शिक्षणाचा करतात ते वादा...


खरं सांगा ना आम्हांला दादा न ताई

भेटतील का परत जगात बाबा ,आई..


कोणीतरी येते पाठीवरुन हात फिरवते

पण आईची माया ,तो हात न जाणवते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy