वणवा
वणवा
मसाला वादळाशी झुंजतांना पाहिले
आसवांचे पावसाळे झेलतांना पाहिले
आगकाडीच्य विनाही रान सारे पेटले
काळजीने काळजाला जाळतांना पाहिले
वावराच्या वाटणीने प्रेम सारे आटले
दोन भाऊ मी धुर्यावर भांडतांना पाहिले
मित्र शत्रू एक झाले राजकारण तापले
मी फुलांना कंटकांशी खेळतांना पाहिले
खोल पाण्याच्या तळाचा अंत नाही माणसा
सागराला मी किनारा सोडतांना पाहिले
