लम्पी रोग
लम्पी रोग
केवढा मोठा हा आजार
शेतकऱ्यांचा दुःखाचा भरला हा बाजार ,
मरणाच्या यातना सोसत गुरं ढोरं
लम्पी तू नायसा हो लवकर,
शेतकरी भयभीत बेचैन
रोग संपुदे याचेच चिंतन,
आसवांचा बांध फुटलाय आता
शेतकरी माझा दुःखी झालाय आता,
पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण
माझं गुर ढोरं आणि संसार चालला काट्यातून,
मुक्या पशूंची ही वेदना
ह्या रोगापासून ईश्वरा तूच वाचव ना,