भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली...
किती ढाळावेत अश्रू
किती आवरावे मनाला,
या साऱ्या दुनियेत
कुठे शोधावे आम्ही तुम्हाला...
जिवापेक्षा मोठं तुम्हा
दुःख कोणतं होतं ?
होतो आम्ही सारे पाठीशी
होती सर्वांचीच साथ...
देवून सर्वांना धोका कसे
वैतागून निघून गेलात,
वाईट तुम्हाला कोणीच म्हणेना
पण वाईट करून गेलात...
बायको लेकरांचा होता
तुम्ही करायचा विचार,
गेला आधार त्यांचा
कोसळला दुःखाचा डोंगर.
जगाची करुन दिवाळी
घेतली स्वतःची करून होळी,
विनाकारण असं अवेळी
नको होता द्यायचा बळी...
वाटेल ती होती तात्या
खरी साथ आमची तुम्हा,
बघायला, बोलाय
ला एकदा
कुठे भेटणार तुम्ही आम्हा..
नको होतं ते अवघड सारं
करुन तुम्ही गेलात,
केवढी मोठी चूक तुमची
धोका सर्वांना दिलात...
थांबत नाही धार डोळ्याची
दाटून येतो हा कंठ,
क्षणाक्षणाला येते आठवण
हे संकट आम्हावर मोठं...
पप्पा म्हणून लेकरांनी
द्यायची कुणाला हाक ?
काहूर माजले मनात फार
चक्रावून गेलं हे डोकं...
एकदा भेटा आम्हाला
घ्या ऐकून आमचं थोडं,
झालंय आम्हा लईच तात्या
हे झालंय फार फार अवघड.
दोन शब्द बोलावं म्हणतो
तुम्हा डोळ्यांनी पहावं म्हणतो,
भावपूर्ण श्रद्धांजली...
अश्रू पुष्प तव चरणी वाहतो...