खेळ
खेळ
रस्त्यावरचा डोंबाऱ्याचा खेळ
सगळ्यांचा मस्त जात होता वेळ.
बाई बिचारी सांभाळून दोरीचा समतोल,
काठीच्या आधाराने वाचवी जीवाचे मोल.
दोरीवरती अचानक तो गेला तिचा तोल
नवरा मात्र रमला होता वाचवण्यात ढोल.
कसाबसा सावरला तिने जीव तिचा अनमोल.
घरी येताना जाईना डोळ्यासमोरून ते चित्र
काळजीत सरली माझी ती अख्खी रात्र.
जीवावरचा करते ती खेळ ती वारंवार?
चालताना दोरीवर येत नसतील का
डोळ्यासमोर मुले बाळे अन् संसार?
काही झाले तर त्यांना कुणाचा आधार?
नीज जशी रुसली माझ्यावर.
विचार करताना लक्षात आले
प्रत्येक बाई असते डोंबारी
संसाराचा गाडा चालवताना
तिचीही चालली असते कसरत..
कर्तव्य प्रेम आवड सवड
ठेवते सगळे एका तराजूत
ज्याचे पारडे जड त्याची आज निकड
जेव्हा मिळते तिला सगळ्यांची साथ
संकटांवर ती करते लीलया मात.
दोन बाजूचे बांबू असतात मुले तिची
प्रेम म्हणजे मधली दोरी
बांधून ठेवते ती आपुल्या परी.
कधी जरी गेला तोल
हाताला आधार तिचा काठी
जसा नवरा असतो तिच्यासाठी.
आजूबाजूचे बघे म्हणजे लोक
रिकामटेकडे ,
नकोच त्यांचे प्रेम नकली
नको त्यांची मदत कसली.
देवाकडे एकच मागणे
एकच होता नवस मागितला..
संसार माझा प्रेमाचा
करू एकमेकांच्या साथीने
आनंदी सुफळ संपूर्ण .
