भाषेचे मनोगत
भाषेचे मनोगत
ज्ञानेश्वरांचे बोट धरून , तुकोबांच्या अभंगातून
बहिणाबाईंची कास धरून , एकनाथांच्या गवळणी
बरोबर निघाली आमची मातृभाषा प्रवासाला.
वाटेत तिच्या ओटीत पडले
शिवरायांचा स्वाभिमानचा मुजरा
बाबसाहेबांकडून
भाईंचे अंत:करणाला भिडणारे
वेगळेच विनोदी रसायन,
रामदासांचे शब्दांचे फटकारे,
गोविंदाग्रज यांची शब्द भांडारे,
कुसुमाग्रजांचे जाज्वल्य प्रेम,
शिरवाडकरांचे हिमालयाला भेदणारे संवाद,
दांडेकरांचा बोलका निसर्ग,
जी. ए .बरोबर अनाकलनीय प्रवास
सगळे कसे आनंद दायी
प्रभावशाली..नवनवीन येत राहिल
आपले उत्तर दायित्व सिद्ध करत राहिले
तिला समृद्ध करत राहिले.
इतक्या शतकाची ही पुण्याई..
त्यांनी त्यांचे काम केले आता असलेले जपायची
जबाबदारी आपली...
नसत्या शंका नसती खुसपट काढू नका.
स्वतःच्या नजरेतून तुम्ही पडू नका.
ती नाही संपणार ,ना तिचे मूल्य कमी होणार.
आपण निर्माण केलेल्या प्रश्नाला
आपणच उत्तर द्यायचे ..
दुसऱ्या कडे बोट दाखवताना,
आपल्याकडच्या तीन बोटांना,आधी नजर भिडवा..
आपल्या मध्ये बदल घडवा.तिला तुमची मदत नको आहे
गरज तुम्हाला तिची आहे भाषांच्या बाजारात
तिचे मूल्य उंचावयाला अन् जपायला..
