लग्न
लग्न
लग्न घटिका समीप आली,
सासरी जाण्याची तयारी झाली..
माहेरच्या प्रेमाची बातच न्यारी
सासरचे प्रेम जगात भारी
नवा आध्याय नवा प्रवास
मिळत नाही काहीच विनासायास
आईच्या कुशीतून बाहेर ये,
बाबांच्या छायेतून ऊर्जा घे,
बहिणीची सावली घेऊन निघ,
सासरच्या घरात प्रवेश कर..
परक्यांचा आपले होण्याच्या,
ह्या सोहळ्यात..
मागचे सगळे ठेव आठवणीत...
म्हणजे आम्हाला त्रास कमी
होईल तुझ्या पाठवणीत..
एक सांगू का तुला पण..
काहीच बदलत नाही खर तर,
आई बाबा बहिण सगळे तसेच,
नाही कोणी वेगळे.
बदलते फक्त एक नाते
पत्नी होऊन तू जाणार,
त्याच्या आयुष्यात....
नवरा न मानता मान,
त्याला सखा तुझा
मित्र न मानता त्याला ,
मैत्र जिवांचा बनव आपला.
एकदा तू हे नाते जपले कि,
बाकी सगळे सोपे होते .
मनाचे मनाशी नाते जडते
त्याचे ते आपले अन् आपले ते त्याचे
ह्या वृत्तीने दोघांमधले अंतर संपते
माहित आहे मला सोपे नाही तितके
नात्यांमध्ये अपेक्षा आली की
त्याचा व्यवहार होतो..
अन् प्रेमामध्ये अभिमान आला
की त्यात कडवट पणा येतो
सगळ्या अपेक्षा,सगळी आधीची नाती,
घराच्या बाहेर ठेव अन्
नव्याने आयुष्य समृद्ध कर
परकेपणांच्या भावनांना कर हद्दपार
काळजी नको करुस तू
आम्ही एका हाकेच्या अंतरावर,
सासर माहेर मिळून कर गोकुळ सुंदर,
आयुष्याच्या प्रवासातील महत्वाचे हे बंदर
आशीर्वाद नेहमी असेल आमचा ,
लढायला देईल बळ तुला
तुमच्या प्रत्येक स्वप्न पूर्ती साठी
आश्वस्त आमचा हात तुमच्या दोघांपाठी
