STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Abstract

3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract

रहस्य

रहस्य

1 min
202

आपण जागे तेव्हा जागे,

आपण निद्रिस्त तरीही जागे

सतत मिनिटा मिनिटांचा हिशोब,

त्यावरच त्याचे आयुष्य सजग


सगळ्यांना एकत्र आणून ,

 एका नाळेने बांधून ठेवून,

आपदमस्तक सगळ्यांची ,

प्रेमाने बडदास्त ठेवून,

प्रसंगी धमकावून,

कधी घाबरवून,

चुकांची जाणीव करून,

सुधारणेचा एक प्रयत्न ,

वाचवण्याचा त्याचा यत्न.

जाणीव नेणीवेच्या पल्याड,

त्याचे कार्य चालते,

न थकता अविरत


वेळीच आवरा चंचल वृत्ती,

ऐका त्याचे सूचक विधान

आपल्याउभ्या आयुष्याचा,

लेखाजोखा असतो ज्याच्याकडे


कुणी रहस्यमय कादंबरीचा

नायक नाही आहे हा...

की कुणी रहस्य शोधणारा 

गुप्तहेर नाही हा ...


आपल्या शरीराचा डोलारा 

सावरणारा 

ह्याच्यावरच आपला भरोसा

हा तर आपल्या शरीराचा अभेद्य भाग

हृदय ह्याचे नाव...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract