होळी
होळी
जाळा अहंकार आणि विचारांचे कृपण
होळीत..
करू उद्यापासून नव्याने जीवनाची सुरुवात
असे अनेक सुविचार वाचायला मिळतील तुम्हाला......आज
पण मी काय म्हणते
कान देऊन ऐका
काय हरकत आहे
थोडा ठेवला अहंकार जर
काय हरकत आहे
विचारांचे कृपण असले तर..
आपल्यामध्ये असणारे गुण
मान्य असतात आपल्याला,
किंबहुना ते आहेतच ही
खात्री असते आपल्याला.
मग दोषही करा मान्य
लढा त्यांच्याशी ,किंवा
कुरवाळा त्यांना..
जे आहे ते आपलेच ..
मान्य केले ना एकदा
की सुरू होतो खेळ
तारेवरच्या कसरतीचा..
कधी सरळ तर कधी
डगमग..कधी सरस
तर कधी सुरस
हा तोल सांभाळला ज्याने
मनाच्या कोपऱ्यात एक
होळी धगधगत ठेवली
असते त्याने...
आत्मपरीक्षणाची
