मराठी भाषेची मजा
मराठी भाषेची मजा
मराठी बोलावे कौतुके
ऐकावे कौतुके
मराठी भाषा दिन म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस..
त्या भाषेची थोडी गम्मत...
आजचा दिन भाषेच्या अभिमानाचा आहे..
इंग्रजीत शुभेच्छा देऊन त्याला दीन करू नका.
भाषेची कास धरा आणि तिचे पाणिग्रहण करा..
नाहीतर परकीय भाषा अतिक्रमण करून तुम्हाला
पाणी ग्रहण करावे लागेल.
तिच्या उत्कर्षाची वाट पहा ,त्या साठी प्रयत्न करा.
नाहीतर वाट लागायला वेळ लागणार नाही.
तसेही इतर भाषांना मराठी भाषेची
वळणे कळणे कठीणच..
पण वळणा वळणाने त्यांनी आपल्या भाषेत
यायला सुरुवात केली आहे.
आपले वळण भाषेला समृद्ध बनवते
तर परकीय भाषेचे वळण दरीत नेते.
इतर भाषेने केलेली कुरघोडी ची अक्षरे
वाळण्या आधी तिला त्यांच्या तावडीतून
सोडवून परत वळण लावून नव्याने
सुरू करा...
बोलतो मराठी आम्ही
ऐकतो मराठी
