राज्य
राज्य
कळायला लागल्यापासून आई म्हणायची ..
तू राजपुत्र आमचा अन् हे राज्य तुझे..
राजपुत्राला कसलाच नाही मान ,
कारण तो होता नेहमीच लहान .
दिवसभर राजा राणी देतील त्या
आज्ञा पाळायाच्या ,
हुकुमावर त्यांच्या नाचायचा.
शाळेत गुरुजींच्या तालावर,
माना डोलवत राहायचा.
चुकले जर तर मार खायचा.
कॉलेज मध्ये मिळाले रान मोकळे ,
पण चरायच्या आधीच त्याच्या,
हातात निकालाचे पत्र आले,
राजाने मग त्याला उभे आडवें झोडपले.
कमवायला लागल्यावर स्वप्न पडली,
संपन्नतेची,मजेची अन् स्वायत्ततेची.
बॉसच्या लहरीमुळे डोळे पुरते उघडले.
लग्नाच्या वेदीवर राजपुत्राने मोठी स्वप्न पहिली..
ती माझी राणी अन् मी तिचा राजा,
आणले मी तिला करून मोठा गाजावाजा.
आता सुरू होणार राजा राणीचे राज्य.
पहिल्याच रात्री राणीने केले ,
डोळे टपोरे अन् आवाज मधाळ,
डरकाळी झाली एका क्षणात मवाळ.
पहिल्याच रात्री राणीने केला घात,
दिली धोबी पछाड अन् एका नजरेत मात.
राजपुत्र राज्याच्या हव्यासात ,
मन राहिला मारत.
आयुष्याच्या संध्याकाळी बंड करून उठला.
लुटुपुटूच्या खेळातला राजपुत्र तो,
राज्यही लुटूपुटू चे ..
आयुष्यभर सगळ्यांनी माझ्यावर राज्य केले.
आता माझ्या मनाचा मी राजा ,
पाहिजे तसा वागणार ,कुणाला नाही घाबरणार.
छाती पुढे काढून अन् मान ताठ करून,
बाहेर जायला निघाला.
बायकोच्या आवाजाने तसाच मागे फिरला.
आपल्याच लोकांनी त्याच्या केली फितुरी.
बनता बनता एक साम्राज्य राजासकट
खालसा झाले...
